गरजेचे निदान करणे ही वेगवेगळ्या व्यवसायांमधील सामान्य पद्धत आहे. या निदानानुसार, पुढील पायऱ्या निश्चित केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या गरजा काय आहेत हे समजून घेण्यासाठी शिक्षक डायग्नॉस्टिक असेसमेंट्स करतात आणि त्यानुसार पाठाचे नियोजन करतात.
या प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. प्रभावी शिक्षण अनुभवासाठी, कृपया कोणतेही नोटिफिकेशन स्वीच ऑफ करा, तुम्ही कोर्स घेत असताना काय शिकलात आणि प्रश्न लिहून घेण्यासाठी वहीचा वापर करा. हा कोर्स डायग्नॉस्टिक असेसमेंट्स, त्याची गरज, त्याचे उपयोग आणि मर्यादा याबद्दल आहे. तुम्ही या कोर्सदरम्यान डायग्नॉस्टिक असेसमेंट्स कसे तयार करायचे तेसुद्धा शिकाल.
यामध्ये 5 सत्रांचा समावेश होतो.
सत्र 1 - डायग्नॉस्टिक असेसमेंट्सविषयी सध्याचा समज काय आहे त्यावर चिंतन केले जाते आणि डायग्नॉस्टिक असेसमेंट्सच्या गरजेचा शोध घेतला जातो
सत्र 2 - डायग्नॉस्टिक असेसमेंट्सचे गुणधर्म, त्याचे उपयोग आणि त्याच्या मर्यादा यांचा शोध घेतला जातो
सत्र 3 - डायग्नॉस्टिक असेसमेंट्स तयार करण्याच्या पायऱ्यांचा शोध घेतला जातो आणि ते तयार केले जाते.
सत्र 4 – काय शिकलात ते आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी निरनिराळे मार्ग
सत्र 5 – मूल्यांकन
टीएएल मानके :
P-1 मानके निर्माण करा किंवा प्राप्त करा – विद्यार्थी मोठ्या ध्येयांविरोधात आहेत का हे निश्चित करण्यासाठी अलाईन्ड डायग्नोस्टिक, फॉर्मॅटिव्ह आणि समेटिव्ह मूल्यमापन (पाठपुरावा आणि श्रेणीकरण प्रणाली)
C-6 डाटा संकलन, चिंतन आणि शिक्षण यांच्या चक्रानंतर, जास्तीत जास्त परिणामकारकतेसाठी आवश्यक असेल त्यानुसार कोर्सशी जुळवून घेते (मोठी ध्येये, गुंतवणूक रणनीती, नियोजन, अंमलबजावणी आणि/किंवा कठोरपणा)
सीईएनटीए मानके
एसए.1.1बी. निरनिराळ्या मूल्यमापन पद्दती आणि साधने समजून घेणे.
एसए.2.1ए. मूल्यांकनाची उद्दिष्ट्ये आणि वर्गाचा संदर्भ विचारात घेऊन मूल्यमापन निवडण्याची/बदलण्याची आणि लागू करण्याची क्षमता.
एसए.2.1बी. मूल्यमापन डाटाचे प्रमाणात्मक आणि गुणात्मक विश्लेषण करण्याची क्षमता.
एसए.2.2ए. मूल्यांकनाची उद्दिष्ट्ये आणि वर्गाचा संदर्भ विचारात घेऊन मूल्यमापन तयार करण्याची आणि लागू करण्याची क्षमता.