या कोर्सचा परिणाम म्हणून शिक्षक आपल्या वर्गात शिकणे आणि सरावाचा वेळ या बाबी जास्तीत जास्त मिळवण्याची खबरदारी घेण्यासाठी वर्गातच उभारू शकतील अशा वर्ग व्यवस्थापन प्रणालीचा शोध घेतील. विद्यार्थ्यांमधील गुंतवणूक निर्माण करताना शिक्षक आधीच अस्तित्वात असलेल्या रचनेसह सामग्री शिकवायला सुरुवात करतील याची खबरदारी घेण्यात ते मदत करेल.

कोर्सचा आढावा :

या कोर्सच्या माध्यमातून शिक्षकांना वर्गसंस्कृतीचे वर्ग व्यवस्थापन आणि वर्ग गुंतवणूक यामध्ये विभागणी करता येणे शक्य होईल. ते वर्ग व्यवस्थापनामध्ये सखोल विचार करतील आणि उत्कृष्ट शिक्षण प्रदान करण्यात वर्ग संस्कृतीच्या भूमिकेबद्दल शिकतील. शिभक म्हणून तुम्ही विविध वर्ग रणनीती शिकू शकाल, ज्या तुम्हाला अगदी दुसऱ्या दिवसापासून तुमच्या वर्गात वापरता येतील आणि तुमच्या वर्गामध्ये उत्कृष्ट वर्ग संस्कृती निर्माण करता येईल.

कोर्सविषयी :

या प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. प्रभावी शिक्षण अनुभवासाठी, कृपया कोणतेही नोटिफिकेशन स्वीच ऑफ करा, तुम्ही कोर्स घेत असताना काय शिकलात आणि प्रश्न लिहून घेण्यासाठी वहीचा वापर करा.

मानके :

हा कोर्स खालील मानकांचे पालन करतो :

1. नेतृत्व म्हणून शिकवणे (टीएएल):

 • E-5 शिकण्यावर जास्तीत जास्त वेळ खर्च करण्यासाठी वेळ वाचवणाऱ्या कार्यपद्धतींची (पुरवठ्याचे किंवा गृहपाठाचे संक्रमण, वाटप आणि संकलन) अंमलबजावणी आणि सराव करते : 
 1. जेव्हा गरज असते तेव्हा कार्यपद्धती स्पष्टपणे समजावून सांगते, कधीकधी सखोल निर्देशन टाळते, कारण अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना प्रस्थापित कार्यपद्धती माहित असतात आणि त्याचे ते पालन करत असतात
 2. “कार्यपद्धती बिघडतात तेव्हा प्रभावीपणे त्यांचा जोर लावते”
 3. बहुसंख्य कार्यपद्धती शिक्षकांकडून सुलभीकरण आणि/किंवा हस्तक्षेप यांनी पुरेशा प्रमाणात चालतात. 
 • E-4 नियम व परिणाम कठोरपणे शिकवून, सराव करून आणि राबवून वर्तनासंबंधी असलेल्या उच्च अपेक्षा कळवते, जेणेकरून विद्यार्थी कठोर परिश्रम करण्यावर लक्ष केंद्रित करून राहतात : 
 1. अपेक्षा जितक्या स्पष्टपणे आणि ठामपणे सांगण्याची गरज असते, तितक्या स्पष्टपणे आणि ठामपणे कळवते, कधीकधी सखोल चर्चा टाळते, कारण त्या पुरेशा प्रस्थापित असतात                    
 2. विद्यार्थ्यांच्या समान गैरवर्तनाला न्याय्यपणे आणि समानपणे प्रतिसाद देण्यासाठी प्रभावीपणे तेच तंत्र वापरते, त्याचवेळी विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा कायम राखते
 • P-5 वयानुरूप दीर्घकालीन आणि अल्पकालीन वर्तन व्यवस्थापन योजना (नियम आणि परिणाम) प्रस्थापित करते, जेणेकरून विद्यार्थ्यांनी अनुपालन केले तर, शिकवण्याच्या वेळेचे प्रमाण आणि मूल्य जास्तीत जास्त होते :
 1. वर्गातील मुख्य गरजांना संबोधित करणारे नियम आखते
 2. तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट आणि सकारात्मकतेने सांगितलेले नियम आखते
 3. प्रस्तुत आणि तर्कसंगत असलेले परिणाम लिहिते 
 4. विद्यार्थ्यांना नियम आणि परिणामांचा स्पष्टपणे परिचय करून देणाऱ्या प्रारंभीच्या योजनेची रचना करते 
 • विद्यार्थ्यांना रचना प्रदान करणाऱ्या आणि शिकवण्याच्या वेळेचे प्रमाण आणि मूल्य वाढवणाऱ्या वर्ग कार्यपद्धतीची (पत्रिकांचे संक्रमण, संकलन आणि हस्तातंरण करणे, हजेरी घेणे, इत्यादी) रचना करते :
 1. वर्गातील महत्त्वाच्या अकार्यक्षमतांना संबोधित करणाऱ्या कार्यपद्धतींची योजना आखते
 2. वर्ग अधिक सुरळीत चालवणे शक्य करणाऱ्या कार्यपद्धतींची रचना करते 
 3. विद्यार्थ्यांना स्पष्टपणे कार्यपद्धतींचा परिचय करून देणाऱ्या प्रारंभीच्या योजनांची रचना आखते 

2. सीईएनटीए :

 • सहभाग, सकारात्मक शिस्त, शिकणाऱ्या गरजांमधील विविधता हाताळणे इत्यादींसाठी सामान्य वर्ग व्यवस्थापन तंत्राची समज दर्शवते; उदा. गटीकरण. 

Course Duration in Hours: Approx. 2-3 hours
Skill Level: Beginner
Certificate On Mail: Yes