या कोर्सचा परिणाम म्हणून, शिक्षकांना याची खबरदारी घेता येईल की, त्यांच्या विद्यार्थ्यांना इंट्रोडक्शन टू न्यू मटेरियलमध्ये शिकलेल्या कौशल्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळेल आणि त्याचा ते वापर करतील, आणि त्यांना योग्य रणनीती योग्य उद्दिष्टाशी जुळवता येईल.
कोर्सविषयी
या प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. हा कोर्स वर्गातील सूचना या श्रेणीमध्ये मोडतो. या कोर्सची 5 सत्रे आहेत. हे आताच प्रारंभ करणाऱ्या शिक्षकांसाठी आहे, ज्यांना त्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थांच्या सरावाचा परिणामकारक पद्धतीने कसा वापर करावा हे शिकायचे आहे. हा कोर्स तुम्हाला प्रशिक्षणात्मक रणनीतींची मालिका शिकण्यात मदत करेल, ज्याची तुम्हाला वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या सरावाला सहाय्य करण्यात मदत होईल.
मानके
हा कोर्स खालील मानकांचे पालन करतो :
- नेतृत्व मानके म्हणून अध्यापन :
ए. P-3 काटेकोर, वस्तुनिष्ठ पाठाच्या योजना तयार करते, जेणेकरून वर्गातील उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्दिष्टांवर प्रावीण्य मिळवता येईल आणि मोठ्या ध्येयांच्या दिशेने प्रगती करता येईल
बी. E-1 स्पष्टपणे शैक्षणिक सामग्री सादर करते, जेणेकरून विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती आणि कल्पना यांचे आकलन होईल.
सी. E-2 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सराव सुलभ करते, त्याचे व्यवस्थापन आणि समन्वय करते जेणेकरून विद्यार्थी सहभागी होतील आणि उद्दिष्टांवर प्रावीण्य मिळवण्याची त्यांना संधी मिळेल.
- सीईएनटीए मानके :
ए. सीडी.2.1ए : सामान्य आणि विषय वैशिष्ट्यानुसार शैक्षणिक पद्धती आणि साधनसामग्रींच्या श्रेणी समजून घेणे.
बी. सीडी.3.1ए : निरनिराळ्या प्रकारच्या नियोजन साधनसामग्रींचे ज्ञान आणि प्रत्येक साधनसामग्री तयार करण्याची प्रक्रिया.
सी. सीडी.3.2ए : शिकण्याचे उद्दिष्ट आणि वर्गाचा संदर्भ विचारात घेऊन पाठ योजना/पाठ्यपुस्तक प्रकरण निर्माण करण्याची क्षमता.