
1. इयत्ता तिसरी ते पाचवीला गणित शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. या अभ्यासक्रमात दोन मॉड्यूल्स आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्ही दोन्ही मॉड्यूल्समधील सर्व घटकांचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. यातील घटकांचा अभ्यास करत असताना तुम्ही मध्ये थांबू शकता आणि परत 'पुन्हा सुरू करा' या बटनाचा वापर करून अभ्यास पुन्हा सुरू करू शकता.
2. प्रत्येक मॉड्यूलच्या शेवटी एक चाचणी दिलेली आहे जी तुम्ही त्या मॉड्यूलमधील सर्व घटक पूर्ण केल्यानंतर सोडवू शकाल.
3. अभ्यासक्रम सुरू करण्याआधी तुम्हाला एक पूर्वचाचणी सोडवायची आहे. त्यानंतर मॉड्यूल १, मॉड्यूल २ आणि नंतर उत्तरचाचणी असेल. मॉड्यूलच्या शेवटी उत्तरचाचणी सोडविणे बंधनकारक आहे.
4. अभ्यासक्रमामधील सर्व मॉड्यूल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.
5. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीची नोंद करून घेण्यासाठी सर्व व्हिडिओ पूर्णपणे बघावे. व्हिडिओ बघत असताना इतरत्र क्लिक करू नये त्याने तुम्ही FIRKI प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडाल.
6. अभ्यासक्रमाचा आढावा घेण्यासाठी पुढील व्हिडिओ बघा.