मुलांचा नवीन भाषा शिकण्याचा एक मार्ग म्हणजे दुसऱ्यांचे ऐकून शिकणे. अस्खलिखितपणे कसे वाचावे ते शिकण्याचे एक प्रारूप म्हणजे मोठ्याने वाचणे. या माध्यमातून शिक्षक कसे वाचतात त्याचे विद्यार्थी निरीक्षण करतात. ते त्यांच्या वैयक्तिक वाचन सरावामध्ये रीड अलाऊडमधून सर्वोत्तम पद्धती वापरण्याचा प्रयत्न करतात.
कोर्सविषयी
कोर्सविषयी
या प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. प्रभावी शिक्षण अनुभवासाठी, कृपया कोणतेही नोटिफिकेशन स्वीच ऑफ करा, तुम्ही कोर्स घेत असताना काय शिकलात आणि प्रश्न लिहून घेण्यासाठी वहीचा वापर करा. रीड अलाऊड म्हणजे काय, त्याचे निरनिराळे भाग आणि रीड अलाऊडसाठी योग्य पुस्तक कसे निवडावे याचा हा कोर्स शोध घेतो.
यामध्ये 5 सत्रांचा समावेश होतो.
सत्र 1 – आमच्या वाचनाच्या पद्धतींवर चिंतन करते आणि रीड अलाऊड काय आहे त्याचा शोध घेते
सत्र 2 – रीड अलाऊडचे उद्दिष्ट व लाभ यांचा आणि आदर्श रीड अलाऊड कसे दिसते याचा शोध घेते
सत्र 3 – रीड अलाऊडच्या निरनिराळ्या भागाचा शोध घेते आणि रीड अलाऊडसाठी योग्य पुस्तक कसे निवडायचे ते शिकते
सत्र 4 – काय शिकलात ते आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी निरनिराळे मार्ग
सत्र 5 – मूल्यांकन
टीएएल मानके :
E-1 स्पष्टपणे शैक्षणिक सामग्री सादर करते (गरज पडल्यास विच्छेदित पद्धतीने) जेणेकरून विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती आणि कल्पनांचे आकलन होते
सीईएनटीए मानके
सीडी.2.1ए. सामान्य आणि विषय वैशिष्ट्यानुसार शैक्षणिक पद्धती आणि साधनसामग्रींच्या श्रेणी समजून घेणे.