या कोर्सचा परिणाम म्हणून शिक्षकांना परफॉर्मन्स टास्क – हे एक माध्यम वापरून उत्कृष्ट शिक्षणाच्या विविध निकषांवर विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापन करता येईल. या कोर्समुळे शिक्षकांना एक प्रभावी परफॉर्मन्स टास्कची रचना म्हणजे काय, का आणि कसे हे शिकता येईल आणि त्याचा समेटिव्ह तसेच फॉर्मॅटिव्ह असेसमेंट साधन म्हणून वापर करता येईल.

कोर्सचा आढावा :

या कोर्सच्या माध्यमातून शिक्षकांना कार्य आधारित मूल्यमापन करण्याची गरज समजून घेता येईल आणि परफॉर्मन्स टास्क हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण मूल्यमापनामध्ये महत्त्वाचे साधन म्हणून कसे काम करते ते शिकता येईल. शिक्षकांना एका प्रभावी परफॉर्मन्स टास्कचे गुणधर्म समजून घेता येतील आणि अशा प्रकारे त्यांच्या संबंधित वर्गांमध्ये परफॉर्मन्स टास्क शिकता आणि निर्माण करता येईल.

कोर्सविषयी :

या प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. प्रभावी शिक्षण अनुभवासाठी, कृपया कोणतेही नोटिफिकेशन स्वीच ऑफ करा, तुम्ही कोर्स घेत असताना काय शिकलात आणि प्रश्न लिहून घेण्यासाठी वहीचा वापर करा.

मानके :

हा कोर्स खालील मानकांचे पालन करतो :

1. नेतृत्व म्हणून शिकवणे (टीएएल):

  • P-1 मानके निर्माण करा किंवा प्राप्त करा – विद्यार्थी मोठ्या ध्येयांविरोधात आहेत का हे निश्चित करण्यासाठी अलाईन्ड डायग्नोस्टिक, फॉर्मॅटिव्ह आणि समेटिव्ह मूल्यमापन (पाठपुरावा आणि श्रेणीकरण प्रणाली)
  • E-2 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सराव (गरज पडल्यास विभेदित पद्धतींनी) सुलभ करते, त्याचे व्यवस्थापन आणि समन्वय करते जेणेकरून विद्यार्थी सहभागी होतील आणि उद्दिष्टांवर प्रावीण्य मिळवण्याची त्यांना संधी मिळेल.   

2. सीईएनटीए :

  • निवडलेल्या विषयातील सामग्रीच्या हेतूचे ज्ञान दर्शवते आणि ही सामग्री ज्या कार्यक्षमता आणि विचार करण्याचे कौशल्य विकसित करते ते दर्शवते.                   
  • मूल्यमापनाच्या निरनिराळ्या उद्दिष्टांची समज दर्शवते, उदा. फॉर्मॅटिव्ह, समेटिव्ह, इत्यादी
  • विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनसाठी (उदा. लेखी चाचणी, तोंडी परीक्षा, सादरीकरण, वर्गसंवाद, इत्यादी) वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती आणि साधने यांचे ज्ञान आणि समज दर्शवतो.                                                                     
  • उच्च दर्जाच्या मूल्यमापन रचनेच्या तांत्रिक तत्त्वांचे ज्ञान आणि समज दर्शवतो.
  • विशिष्ट विषय आणि चाचणीचे उद्दिष्ट यासाठी योग्यपणाच्या बाबतीत मूल्यमापनाच्या पद्धतींचे ज्ञान दर्शवतो.
  • ‘थेट’ उदाहरणे, परिस्थिती निर्माण करण्यासाठी आणि विविध विषयांवरील चर्चा, जसे आणि जेव्हा प्रस्तुत असतील तेव्हा, करण्यासाठी वर्गातील परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या अनुभवांचे लाभ घेण्याची क्षमता दर्शवतो

 


 


Course Duration: Approx. 2-3 hours
Skill Level: Beginner
Certificate On Mail: Yes