विद्यार्थ्यांच्या शिकण्यामध्ये (शैक्षणिक तसेच बिगर-शैक्षणिक) आई-वडील आणि पालकांना सहभागी करून घेतल्यामुळे त्यांचे शिकणे, विकास आणि स्वास्थ्य वाढते हे ज्ञात आहे. पालकांचा सहभाग कसा दिसतो, त्याचे लाभ आणि पालकांना तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये सहभागी करून घेणे आणि त्यांना त्यांच्या मुलांच्या शिकण्यात गुंतवून घेणे यासाठीच्या काही रणनीती या सर्व बाबींचा शोध घेण्यात हा कोर्स तुम्हाला मदत करतो.
कोर्सविषयी
या प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. या कोर्सच्या माध्यमातून शिक्षक हे शिकतील की त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आई-वडील/पालकांना भागीदार करून घेणे आणि सहभागी करून घेणे महत्त्वाचे का असते आणि ते प्रभावीपणे कसे करावे.
या कोर्समध्ये 5 सत्रांचा समावेश होतो :
- सत्र 1: जाणीव होणे : या सत्रामध्ये तुम्ही आई-वडील आणि पालकांना सहभागी करून घेण्यासंबंधी तुमचा सध्याचा दृष्टीकोन तपासून पाहाल.
- सत्र 2: कल्पना करणे : या सत्रामध्ये तुम्ही पालकांचा सहभाग म्हणजे काय, तो महत्त्वाचा का असतो आणि सहभागी पालक कसे दिसतात याचा तपास कराल.
- सत्र 3: करणे : या सत्रामध्ये तुम्ही आई-वडील आणि पालकांना सहभाही करून घेण्यासाठीच्या रणनीतींचा शोध घ्याल आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण आणि विकासामध्ये सहभागी करून घेण्यासाठी मदत कराल.
- सत्र 4: सामायिक करणे : या सत्रामध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या आई-वडील आणि पालकांना प्रभावीपणे भागीदार करून घेण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुमचे शिक्षण सामायिक करण्याचे मार्ग शोधाल.
- सत्र 5: मूल्यमापन : या सत्रामध्ये तुम्ही आई-वडील आणि पालकांना सहभागी करून घेण्यासंबंधी काय शिकलात त्याची परीक्षा घ्याल
मानके : हा कोर्स खालील मानकांचे पालन करतो :
1. नेतृत्व म्हणून शिकवणे : I-6 थेट स्पष्टीकरण, आदर्श, मॉडेलिंग, सातत्याने मजबुतीकरण आणि मार्केटिंग, इत्यांसारख्या तंत्रांचा वापर करून आदराने विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकणाऱ्यांना एकत्र करते (उदा. कुटुंब, सोबती, कोच, धर्मोपदेशक), जेणेकरून ते विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोठ्या ध्येयांप्रति कठोर मेहनत करण्यासाठी सक्रिय सहभागी होतात.
2. सीईएनटीए :
आरपी.1.1ए : विद्यार्थ्यांची स्थिती, वाटचाल आणि प्रगती याविषयी त्याच्या/तिच्या पालकांना योग्यरित्या कळवण्याची क्षमता.
आरपी.1.1बी : मुलाच्या विकासामध्ये पालक आणि समूहाने सहभागी होण्याचे महत्त्व समजून घेणे आणि त्यांना सहभागी करून घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सामान्य पद्धती.