या कोर्समध्ये तुम्ही बिहेवियर मॅनेजमेंट सायकलचा शोध घ्याल, ही तीन पायऱ्यांची प्रक्रिया आहे, ज्चा वापर शिक्षक त्यांच्या पाठांमध्ये शिकण्याचा कालावधी वाढवण्यासाठी करू शकतात. हे साधन शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वर्तनावर प्रभाव टाकण्यासाठी आणि इच्छित परिणाम साधण्यासाठी मदत करते.

कोर्सविषयी

या प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. प्रभावी शिक्षण अनुभवासाठी, कृपया कोणतेही नोटिफिकेशन स्वीच ऑफ करा, तुम्ही कोर्स घेत असताना काय शिकलात आणि प्रश्न लिहून घेण्यासाठी वहीचा वापर करा. वर्गामधील शिस्त ही शिकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक असते. या कोर्समध्ये आपण बिहेवियर मॅनेजमेंट सायकल या साध्या साधनाबद्दल जाणून घेऊन पण सहभाग घेणाऱ्या तरीही शिस्तबद्ध वर्गाची पुनःकल्पना करू.

मानके

हा कोर्स खालील मानकांचे पालन करतो

नेतृत्व म्हणून शिकवणे

I-5 मूल्ये (उदा. आदर, सहिष्णूता, दयाळूपणा, सहयोग) रुजवण्यासाठी तर्कसंगतदृष्ट्या मन वळवणे, आदर्श, आणि सातत्याने मजबुतीकरण व मार्केटिंग यांच्या माध्यमातून आतिथ्यशील वातावरण निर्माण करणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना मोठ्या ध्येयांचा प्रयत्न करण्यासाठी आरामदायी आणि पुरेसा आधार वाटेल.

E-4 अध्यापन, सराव आणि नियमांची अंमलबजावणी व परिणाम यांच्याद्वारे वर्तनाबद्दल उच्च अपेक्षांची माहिती देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करण्यावर लक्ष केंद्रित करता येते.

सीईएनटीए

सीसी.1.1ए निरनिराळ्या प्रकारच्या वर्ग रचनांमध्ये सहभाग, सकारात्मक शिस्त, विविधता हाताळणे, इत्यादींसाठी सामान्य वर्ग व्यवस्थापन तंत्राची समज.

सीसी.1.1बी विद्यार्थ्यांची शारिरीक सुरक्षा, आराम आणि भावनिक सुरक्षितता यांची खातरजमा बाळगण्यासाठी वर्गाचे आणि त्याच्या सुविधांचे संयोजन करण्याची क्षमता.


Course Duration: Approx. 2-3 hours
Skill Level: Beginner
Certificate On Mail: Yes