मी संध्या कुलकर्णी. जि.प.प्रा.शा. ढवळापुरी के.शेकटा. ता. जि औरंगाबाद. मी २री वर्गात computational thinking वरील तासिका घेतली. १ते४ अंकाचे कोडे सोडवून घेतले. विद्यार्थी प्रतिसाद खूप छान मिळाला. छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना अवघड कोडे सोडवण्यात खूप मजा आली. सृष्टी पुंगळे हिने तर दोन मिनिटातच कोडे सोडवले. त्यानंतर ईश्वरी, मनोज, राजनंदनी, उवेस अंकिता, स्वराज अनेकांनी सोडवले. सृष्टीने या पुढील पायरी गाठली. तिने १ते५ चे तयार करून १ते६चे सुरू केले.. मला कल्पनाही नव्हती मुलांना ही संकल्पना इतक्या लवकर समजेल. मी अगदी सहज पणे तासिका घेतली. कारण ही तासिका ५ते७ची होती. Thanks to विद्याप्राधिकरण. आमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली.
Forum